अझिझ,
लेका बर्याच काळानंतर एक पुस्तक मस्तपैकी मागे लागलंय., म्हणजे भावनिक पसारा तसा आटोपशीरच पण बुद्धीतत्त्वावर लढणा-या आपल्यासारख्यांची हौस भागवणारं.
तुला आठवत असेल तर असं एखादं पुस्तकंच नव्हे तर वाक्य, शब्द किंवा अगदी कोणता-कोणताही आनंद उकळत्या उत्साहानिशी सांगण्यासाठी ’दाजीsssssssss’ म्हणून ओरडत पाठीला पाय लावून पळायचो आपण.
आपण साले आर्किमिडीज असतो तर दाजी, दाजी म्हणूनच ओरडत आलो असतो ना रे? किंबहुना मला वाटतंय की आर्किमिडीजचा आजा दाजींसारखा असता ना तर त्यालाही युरेका ची भानगड सुचलीच नसती.
पुस्तकं वाचणारे बहुत आहेत दोस्ता, पण दाजींसारखा पुस्तक खुलवून सांगणारा कुणी नाही. दाजी म्हणजे चालतं बोलतं पुस्तक होते, जगातल्या कोणत्याही पुस्तकाचा सारांश स्वत:च्या शब्दात खुलवणारे.
'I miss him badly.'
शांता गोखलेंच्या ’त्या वर्षी’ बद्दल म्हणत होते मी. शेवटची ओळ वाचून संपल्यावर हे पुस्तक आवडण्याचं एक कारण....लेखिकेने तटस्थपणे समोर मांडलेली पात्रं.
गडया, रंगमंच उभा करणं सोप्पंय पण त्यातल्या पात्रांना हवा तसा तो वापरु देणं हे कठीण! आपली कलाकृती मांडताना त्यात फक्त संकल्पना ओतत नाही मी, माझ्या संवेदनाही नकळत उमटत जातात.
अखंड शिल्प तयार झाल्यावर कुठे कुठे कोरीव जागी उरतो आपण मागे...स्पर्शातून कधी नेणिवांतूनही.
इथे मात्र एक संपूर्ण कॅनव्हास कुंचल्याचा, हव्या तशा रेघोटया मारण्याचं स्वातंत्र्य....आकाश आणि अवकाश प्रत्येकात खोल खोल बुडी मारण्याचं अवधान.
असं स्वातंत्र्य मला देता येईल का? माझीच सावली पूर्णपणे शरीरावेगळी करुन पाहंयाचे प्रयत्न चूक की बरोबर? लेखिकेने ते केलंय हे वाटणंही माझ्याच बुद्धीनुसार....पण ’ दाजींचं पुस्तक सांगतं, ’आपला आपल्याशीच झगडा असावा, तो संपेपर्यंत काहीतरी वेगळं गवसलेलं असतं...त्यालाच मंथन म्हणतात गुंडया.’
पुस्तकात काही संदर्भानुसार येणा-या छोटया गोष्टी....तिथे काहीवेळ थांबून आपलं निरांजन आपणच घासून पुसून लख्ख करावंसं वाटलं मला.
त्यातलीच एका’काशुओ इशिगुरो’ नावाच्या जपानी लेखकाची गोष्ट,
’त्यातला ओनो हा चित्रकार. तो आणि इतर शिष्य़ गुरुकुलात राहतात. सर्वच जण गुरुंच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चित्र काढत असतात पण ओनो मात्र अस्वस्थ मनातून. गुरुंचं चित्रविश्व अति-रोमॅंटिक.
सुंदर गेशा, साके पिउन रंगलेल्या रात्री, पण ओनोला आजूबाजूचं वास्तव अस्वस्थ करत असतं. त्याची नवी चित्र पाहून गुरु नाराज होतात; पण हसण्यावारी नेतात. ही तरुणपणाची खुमखुमी आहे म्हणतात.’ही रग जिरेल आपोआप तोपर्यंत रंगव असली चित्रं.’
ओनो म्हणतो हा माझा विचार आहे, चित्रकाराने सदैव सौंदर्यात रममाण होणं मला योग्य वाटत नाही. आपला काळ कठीण आहे. कलाकारांनी आपल्या कामात भोवतालच्या परिस्थितीला महत्त्व दिलं पाहिजे. गुरुंचा भडका उडतो. ते त्याला ’चालता हो’ सांगतात. ज्या दालनात त्यांचं हे संभाषण चालू असतं ते हळूहळू अंधारायला लागतं. ओनो शांतपणे एकेक कंदील पेटवू लागतो. हे त्याचं गुरुकुलात रोजचंच काम असतं, तेवढं करतो आणि निघून जातो.’
आपल्या प्रत्येकात एक ओनो लपलेला नसतो? फळ्यावरचं चित्र बघून पावसातली बाई काढताना? सगळे सिद्धांत मान डोलवून वहीत छापताना? ’हे बरोबर नाही, कारण हे असंच आहे पूर्वीपासून’ अशी निरगाठ अधिकाधिक पक्की करताना.?
मनातले गोंगाट बाहेर न दाखवता हाच ओनो शांतपणे आपल्याच पेशींना कधी परका होतो याचा विचार करतो आपण? सृजनशीलतेला नियम असतात?
एका ’पेंटींग कॉम्पिटिशन मध्ये’ काढलेलं चित्र पाहता पाहता परीक्षक गंभीर होतात., सगळया चित्रांचे कागद चार वेळा तपासून बघताना त्यांना तेच काळ्या रेघोट्या मारुन विद्रूप केलेलं चित्र परत परत अस्वस्थ करतं. त्याहूनही अस्वस्थ करतं ते वास्तव...बारा वर्षाच्या मुलाच्या हातून असं काहीतरी का उमटावं?.......त्या मुलाला बोलवून ते प्रेमाने त्याची चौकशी करतात.
चित्रातली प्रतिमा त्याची आई....पण दुसरी. तिच्या वास्तवातल्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या मनातल्या आईच्या प्रतिमांवर असेच ओरखडे उमटत जातात. ऐकून परीक्षकांकडे सांत्वनापुरते शब्दच उरत नाहीत.
मुलाच्या चित्राला पहिलं बक्षिस मिळतं. मुलगा मात्र मान खाली घालून उभा असतो कोरडा....रखरखीत. चित्रातल्या काळ्या रंगासारखा ठळक.
आपण सौंदर्यच पाहिलं मग ते रेखाटू नये असं नाही रे पण कुणाच्या चित्रातल्या दाहक प्रतिमा फोल ठरवणारे आपण कोण?
*************
पुस्तकात रेंगाळावंसं वाटणारी ही दुसरी जागा....काही मान्यवर चित्रकारांपैकी एकाच्या भाषणातून येते.
सत्य आहे, आजच्या बर्याच कलाकारांची कैफियत आहे.
’ऐंशीच्या दशकात आमच्यासारखे चित्रकार जे कलाविश्वात उतरले त्यांच्या आणि आजच्या परिस्थितीत काही साम्यस्थळे आहेत. आमच्या चित्रांना तेव्हा जशी मागणी नव्हतीच तशीच आजच्या इन्स्टॉलेशन्स, व्हिडीओ कलाप्रकारांना नाही.
’प्रोग्रेसिव्ह ग्रूप’ ने करुन करुन दिलेल्या वाटांचा आम्हाला किती फायदा झाला याचं वर्णन करुन सांगणं कठीण आहे. मी बंगालमधला. तिथं एका बाजूला अबनींद्रनाथ टागोर आणि दुसर्या बाजूला जामिनी राय्हे तथाकथित अस्सअल भारतीय कलेचे प्रतिनिधी. त्यांच्य कामात आम्ही आम्हाला सापडत नव्हतो. तो काळ नवतेचा. भाकरा नांगल धरण उठत होतं. ’ल कॉर्ब्युझीए’ चंदीगढ बांधत होता. बिमल रॉयने ’दो बिघा जमीन’ हा समाजाची काळी बाजू दाखवणारा चित्रपट तयार केला होता. त्याही आधी उदयशंकरनं ’कल्पना’ चित्रपटाची निर्मिती करुन नृत्यकलेला उच्चअस्थान प्राप्त करुन दिलं होतं.
आम्ही कोणीही परंपरा नाकारली नाही. तिला तात्पुरती दृष्टीआड केली. काही निर्माण करायचं झालं की काहीतरी तोडावं लागतं. हे सर्व सृजनात्मक कार्याचं तत्त्व आहे. अशा काळात कलाकार स्वत:ला पूर्णपणे ताणत असतो. दृष्टिक्षेपातलं शेवटचं टोक गाठत असतो. ते गाठल्यानंतरच ह्या देशात वाढलेल्या, रुजलेल्या आणि अंत पावलेल्या चित्रपरंपरा आणि वर्तमानातले प्रवाह यात कुठे तरी तो आपला सर्जनशील बिंदू शोधण्यात सक्षम होतो....
त्या वेळच्या समाज अभिरुचीला केवळ वास्तववाद मान्य होता. मध्यमवर्गीयांना जी चित्र पटकन कळली, भावली अश साध्या सोप्या गोष्टी सांगणा-या देखावे रंगवणा-या चित्रांनी ही अभिरुची घडवली होती. तिची कास सोडायला हा वर्ग तयात नव्हता. त्यामुळे आमच्या प्रयत्नाला तिरस्काराखेरीज या समाजाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
आज एका दिवंगत कलाकाराचं चित्र १५ लाख रुपये किमतीला विकलं गेल्याची बातमी आपण अभिमानाने सांगतो, तेव्हा हे ध्यानात ठेवलं पाहिजे की त्याचं १लं चित्र विकलं गेलं ते ३२व्या वर्षी २०० रुं. ना., ते ही पाश्चिमात्त्य संग्राहकाला. तो आप्ला माणूस होता, आपल्या मातीत जन्मलेला. म्हणून आज आपण गर्व करतो पं त्याच्या हयातीत त्याच्या कलेला आपण परकी कला ठरवलं होतं हे विसरुन चालणार नाही......’
आपण जिवंत असताना संस्कृती गतप्राण होतेय म्हणून बोंबलू कसे शकतो आपण?
मोठाच्या मोठा उतार झालाय आपापलीच तत्त्वं झापडं लावून फरफटत नेण्याच्या प्रयोगात....पायथ्याशी संस्कृतीचे रक्षणकर्ते.....टोकावरच्या लोकांशी त्यांचा संपर्कच तुटलेला. मधले पूल गायब. अशी टिकेल संस्कृती की संस्कार?
असले प्रश्न विचारुन भंडावून सोडलं तरी पक्क्या विचारांच्या बैठकीनिशी माझं मलाच उत्तर शोधायला लावणारे दाजी....त्यांना कुठे रुढीप्रिय राहण्याची सवय होती? पण रुढीप्रिय नाही म्हणून आपल्या पाळामुळांविषयी आपल्याला ठाउक असणंच महत्त्वाचं नाही या मताचे मात्र नक्कीच नव्हते.
आपला विश्वास आहे की नाही हा अध्याय पुढचा पण उद्या भांडायचं झालंच तर ज्ञान मात्र हवं अगदी पुढच्या मागच्या दोन्ही खंडांचं. पाया डळमळीत बांधून मजले रचण्याचं तंत्रज्ञान फुकाचं, त्यात कसब नाही. मग पत्त्त्यांसारखे कोसळले की लढवणार आपण नवशिके मावळे.
पुस्तकांचं एक आवडतं...नवनव्या पटांवर अशी चेकमेट करण्याची, होण्याची मजा असते. आपापल्या ताकदीनिशी आपण तानाजी लढवायचा.... फक्त इथे सरशीपेक्षा, लढत महत्त्वाची.
************
दाजींच्या एका नाटयप्रयोगातलं माझं एक ज्याम फेवरेट वाक्य आठवतंय आत्ता. त्याचे तपशील तूच शोध.
श्रीमंत, लेकीची खेळण्याची हौस संपलीये.....
आपणच उभारलेल्या रंगमंचावर थोडं कसदार होउन वावरु दे तिला....सम्राज्ञीपण पेलवताही यायला हवं..जोपर्यंत त्याची मिरवणूक निघत नाही तोपर्यंत पडदा टाकण्याची गरज नाही.
Wednesday, August 26, 2009
Monday, August 10, 2009
भिंगरी
’शिर्या, धांदरटा...नादिष्ट पोर कुठला...आलास का छळायला, उठसूठ पोरीला नादवू नको...’
नानीचा धाक, थोडीशी भिती..बराचसा बेदरकारपणा. तरी तू आणि मी वा-याच्या पोरासारखे आळीतनं पसार.
कोवळ्या नाजूक हिरव्या रसरशीत चिंचा..... वर वर अगदी झुल्याच्याही टोकावर.
’शिर्या काढून दे ना..... सुट्टीत माझ्या डब्यातली घावनं तुझी.’
’नकटे...ती अशीही मीच खाणार...तू उपास कर काकूसारखे..कित्ती फुगलीयेस.’
’बारीक पेराचा, गोबर्या गालाचा आणि हनुवटीला उभा छेद देणा-या जिवणीचा...शिर्या माझा दोस्त आहे गं नानी.’
नानी फुरगट....नुसती तिची वटवट. तिला कोण जुमानील.
नानीबरोबर लोकं पण वेडी....’शिर्या आणि सुमाचं लग्न करुन टाका. जोडी छान दिसते.’
भलतंच काहीतरी शिर्या रे...लोकांच्या पोरी उजवायच्या कशा, गावभर चुली पेटवायच्या कशा...लोकांना एवढंच काम.
सगळी वेडी लोकं भलतीच शहाणी झाली....ऊसावर ऊस काढतात, सगळ्या पोरींना राबवतात. म्हणजे पोरी फिरणार नाहीत, आई-बापाचं नाव मातीत मिसळणार नाहीत. वेडेच वेडे....सगळेच वेडे.
दोस्ता आपण फरफटलो, चौकटीत फिरवलेल्या गोटीसारखे....एकानं इकडून हलवावं..दुसर्याने दुसरीकडून....दोघांचेही अंदाज वांझोटे निघाले तर आपण आपले वेशीवर...ना दरीत ना हिरवळीवर.
*********
’एवढंसं बोललं म्हणून रडतात का कोणी, गाढव कुठली...’
’दादा, मला येतं रडू...रडलं की बरं वाटतं.’
’तिचं काय चुकलं....ताईच्या जाण्याचा मीच धसका घेतला फार आणि मागाहून ही झाली म्हणून तिला फुलासारखं जपत गेले...आता वाटतं तेच करायला नको होतं... सोडून द्यायला हवी होती, म्हणजे श्रीकांतसारखी झाली असती. माझंच चुकलं...
आता माईला तिची चूक कळेपर्यंत मी मोठी झालेही ही काय माझी चूक?
सुमा स्वयपाक बघ...पाणी बघ...रांगोळी शीक, आणि अभ्यासही नीट कर....नोकरी करशील तर घरही सांभाळ....सासर जपून ठेव. मी काय आदर्शवादी बुजगावणं आहे, वाईट भुतं पळवून लावायला.
मला आवडते की आपली गावदेवी....तिच्या डोळ्याला गिरिजा घाबरते. मला तेच डोळे आवडतात. नजरेत कशी धाक आहे तिच्या तेवढीच माया सुद्धा. देवी असावी तर अशी. आणि स्त्री असावी तर मामींसारखी.
विचार कसे आखीव, रेखीव....मनाला पटेल ते ऐकणारे..तस्संच वागणारे. मामीच्याच काय तिच्या नवर्यामागेही हीच वेडी लोकं बोलतात..पण त्यांना मामी जुमानीत नाही ना तिचा नवरा.
***********
’बस ना मागे, आजच नवीन आणलीये.....’
’नक्को...भिती वाटते..’
’मी काही गटारात नेउन घालणार नाहीये...आणि पडलीस तर पडलीस..जरा खरचटू दे, बरंच होईल.’
’नाही मी काही घाबरत बिबरत नाही मागे बसायला पण नकोच. नानीला कळलं तर जपमाळेत देवाऐवेजी माझ्याच नावाचा उद्धार करील. राहू दे.’
पूर येउ देत पूर....पळून जातील माणसं...आपण सुद्धा पळून जाउ. म्हणतील मागच्या मागे गेली एकमेकांबरोबर पळून...बरंच आहे.
*******
शिर्या तू गावात ये, आपली शाळा बंद करायला निघालेत ही वेडी लोकं.. मुलींची फार संख्या नाही म्हणे...चोर कुठले. यांनीच बसवल्या घरी मुली. मी शहरातून आले की बघून घेईन एकेकाला.
लग्न करीन तर प्रशासकीय अधिका-याशीच असं ठणकावून सांगितलंय नानीला. तिची खात्री पटली....मी स्वार्थ पहायला शिकले म्हणून. तशाच समजुतीत राहो. मला नवर्याचा अधिकार हवाय...सगळ्यांना बघून घ्यायला एकजात.
पैसे काय एकडूनही खुळखुळ नी तिकडूनही. नानीला देउन टाकीन नोटा....बस म्हणावं मोजीत.
मी गेम करणार शि-या....शूटमधला नाही..खराखुरा. यांचा डाव खडी लावून मोडणार.

Subscribe to:
Posts (Atom)